मा. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्षांवर केली मोठी कारवाई.

पक्ष विरोधी कार्य केल्यामुळे केली कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी  पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची  शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून कारवाई करण्यात आली आहे.

 पक्ष विरोधी कार्य केल्याबद्दल शरद सोनवणे यांची शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात आल्याबाबत शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्र दिले आहे. त्या  दरम्यान,  बुलढाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी शिवसेनेच्या उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिल्याचं पत्र जिल्ह्यात वायरल झाले होते. पण हे पत्र खोटे आणि चुकीचे असल्याचा खुलासा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.  मैत्रीपूर्ण लढतीतील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा  या पत्रावर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी खुलासा केला आहे. हे पत्र खोटे असून मतदारामध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न आहे, असे आवाहन अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केले आहे.  खोट्या अफवा आणि खोट्या पत्रावर कोणीही विश्वास ठेऊ नये,