लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमरावती – कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून शेतकऱ्यांचं भलं करण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरी विरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे. अशा शब्दात संताप व्यक्त करीत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वाटपाच्या १४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला श्रीमती राधा यांनी आक्षेप नोंदवला होता. खतांच्या खरेदीसाठी पीएम प्रणाम’ योजनेतंर्गत मिळणारे अनुदान हे २५० कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असे मत राधा यांचे होते. शेतकरी सन्मान योजनेचा निधीचा एक हप्ता वळवण्यासही विरोध होता. या योजनेतील 1400 कोटी वळविण्याला त्यांनी विरोध केला. तरी मंत्री कार्यालयाचा निधी वळविण्याचा अट्टाहास होताच. राधा यांनी निविष्ठा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता. फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक आक्षेप घेतला होता. ‘या अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता’ असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने श्रीमती राधा यांची बदली केली आहे.
कृषिमंत्र्यांचं जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. हे दुर्दैव असून कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाईला आणणारा असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
अंतराळ संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ मच्छिमारांना होणार -डॉ. अतुल पाटणे