सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा आणि सुनिल देशपांडे यांना गोंडवाना विद्यापीठाकडून मानद पदवी बहाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १० मार्च:- सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा आणि सुनिल देशपांडे यांना गोंडवाना विद्यापीठाकडून मानद पदवी प्रदान करण्याबाबतच्या प्रस्तावास राज्यपाल कार्यालयाकडून मंजूरी मिळाली असून दिनांक १०/०३/२०२१ रोजी विद्यापीठात पार पडलेल्या अधिसभेत मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

देवाजी तोफा गडचिरोली जिल्हयातील मेंढालेखा या गावातील असून ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ हे त्यांच ब्रिद वाक्य आहे त्यांच्या नेतृत्वामुळे गावाला त्यांचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या असंख्य प्रयत्नातून मेंढालेखा हे गांव आदर्श गाव म्हणून ठरले आहे या गावाने पर्यावरणाचे रक्षण कसे करावयाचे हे दाखवून दिले आहे. ग्रामसभेच महत्त्व त्यांचे अधिकार आणि अंमलबजावणी हे सारेच मेंढालेखा गावाने देवाजी तोफा यांच्या नेतृत्वातून दाखवून दिले आहे.

सुनिल देशपांडे हे ग्रामीण/आदिवासी कारागीर क्षेत्रामध्ये कामाचा मोठा अनुभव असलेले सामाजिक

कार्यकर्ते आहे. धारणीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या लवादा येथे ‘संपूर्ण बांबू केंद्र, मेळघाट’ येथे आहे. देशपांडे दाम्पत्य मागील वीस वर्षापासून काम करीत असून बांबूच्या माध्यमातून मेळघाटातील आदिवासींना रोजगार देण्याचे काम करीत आहे. तसेच संपूर्ण बांबू केंद्र सुनील व निरुपमा देशपांडे या दाम्पत्याने स्थापन केलेल्या या केंद्राने आदिवासींच्या कौशल्याला आगळे बळ दिले.

देशाच्या निर्मीतीमधील आपली निष्ठा, योगदान, सेवाभाव या बाबीचा विचार करुन ही पदवी प्रदान करतांना गोंडवाना विद्यापीठास अभिमान वाटत आहे. आजच्या नवीन पिढींना या कार्यातून नेहमीच प्रेरणा मिळत राहील, अशी अपेक्षा कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केली आहे.