दिड वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

खा. अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 1 जुलै : भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने कोविड-19 च्या गेल्या दिड वर्षांच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा (कोविड योध्याचा) सत्कार आज दि 1 जुलै रोजी करण्यात आला.

याप्रसंगी खा. अशोक नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगिताताई पिपरे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ सोळंखी, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके इत्यादींचा सत्कार शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व वृक्षांचे रोप देऊन करण्यात आला.

यावेळी जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जिप चे कृषी सभापती रमेश बारसागडे, जिप समाज कल्याण सभापती रंजीताताई कोडाप, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, महिला आघाडी च्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, पुष्पाताई करकाडे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

ग्राम स्वच्छता अभियानात गडचिरोली मधील पारडीकुपी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय विशेष पुरस्कार

महागाव येथे हत्तीरोग निर्मूलन अभियानाचा शुभारंभ

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

 

Ankit Goyalashok neteDipak Singlakumar Ashirwadlead story