गर्भातून उमललेली आशा… आणि डोंगरात जन्मलेलं भविष्य”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ओमप्रकाश चुनारकर,

जिथे नकाशे संपतात, तिथे माणसांच्या गरजा संपत नाहीत. सुरजागडच्या डोंगरकपाऱ्यांत वसलेल्या हेडरी गावात, नक्षलवादाच्या सावल्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी जनतेला बहुतेक वेळा सरकारी व्यवस्था फक्त फतव्यांसारखी भासत आली; पण जेव्हा त्या अंधाराच्या मध्ये एक रुग्णालय उभं राहतं, तेव्हा तो केवळ आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू राहत नाही, तर तो विश्वासाचा मंदिर ठरतो. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने उभारलेल्या लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलने आज केवळ दोनशेव्या बाळाचा जन्म नोंदवला नाही, तर दोनशे वेळा जीवनाची शक्यता नव्याने लिहून दाखवली आहे.

हेडरी सारख्या भागात जिथे पायाभूत सुविधा म्हणजे एक स्वप्न, तिथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पोहोचवणं ही केवळ CSRची जबाबदारी नव्हे, तर ती मानवी मूल्यांची अभिव्यक्ती आहे. हा केवळ एक प्रसूतीगृह नाही, हा त्या आईच्या नजरेतला विश्वास आहे, जिला तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी विचारलं – “तुला काय हवं आहे?” नोव्हेंबर २०२३ मध्ये जेव्हा हे हॉस्पिटल उभं राहिलं, तेव्हा या परिसरातील मातांचं जगणं केवळ प्रसंगी मरणं होतं; पण २९ जानेवारी २०२४ रोजी जेव्हा पहिलं बाळ इथे जन्मलं, तेव्हा त्या मातृत्वाला आरंभ झाला, ज्याला आतापर्यंत केवळ वेदनांचा इतिहास होता.आज दोनशेवं बाळ त्या रुग्णालयातून जन्मलं तेव्हा तो फक्त जन्म नव्हता, ती एक जाहीर घोषणा होती – की दुर्गमतेचा अर्थ दुर्लक्षितपणा नसतो आणि खाणींमधून निघणाऱ्या धातूपेक्षा मौल्यवान असतो तो जन्मलेला जीव. व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांचं उपस्थित राहणं हा केवळ औपचारिक भाग नव्हता, तर एका उद्योजकाने माणुसकीच्या भूमिकेतून घेतलेली प्रतिज्ञा होती, जिथे लाभ आणि लॉजिस्टिक पेक्षा महत्त्वाचं ठरतं आईच्या डोळ्यातलं पाणी. एलकेएएम हॉस्पिटलने जेव्हा हे दोनशेवं बाळ जन्माला घातलं, तेव्हा त्या प्रत्येक बाळाच्या जन्मामागे एक नोंद झाली – की जिथे पूर्वी मृत्यूची वाट बघणं हे नियती मानलं जात होतं, तिथे आता डॉक्टरांच्या हातात जन्म नोंदवला जातो.

महिन्याला सरासरी ११ पेक्षा अधिक बाळं इथे जन्म घेत आहेत, ही फक्त आकडेवारी नाही; ही आश्वासनं आहेत, जी एका-एका पिढीला धडधडतं भविष्य देत आहेत. आज ३० खाटांचं हे मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय १०० खाटांपर्यंत विस्ताराच्या तयारीत आहे, आणि त्या प्रत्येक खाटेवर फक्त शरीर नाही, तर स्वप्नंही आराम करत असतात. शस्त्रक्रिया, औषधे, सल्ला, राहणं, जेवण – हे सर्व मोफत पुरवणं ही CSRची योजना नसून, ती मानवतेची पुनर्स्थापना आहे.

एखादी आदिवासी माता जेव्हा शहरातही मिळत नाहीत अशा तज्ञ डॉक्टरांच्या हातात सुरक्षितपणे प्रसूती करते, तेव्हा त्या आईच्या तोंडावरून भविष्याची दिशा ओळखता येते. ती दिशा उत्तर किंवा दक्षिण नसते, ती दिशा केवळ एका प्रश्नाकडे नेते – “हे आधी का नव्हतं?” आज दोनशेवं बाळ जन्मलं हे कौतुक नाही, तर दोनशेवेळा शासन, समाज आणि व्यवस्थेला आरसा दाखवणारा एक शांत, पण स्फोटक संदेश आहे – की जिथे इच्छा असते, तिथे बदल घडतो. आणि जिथे माणुसकीच्या कुशीत बाळ जन्म घेतं, तिथे कोणतीही यंत्रणा दुर्गम राहत नाही. हा केवळ जन्माचा दिवस नाही, हा आशेचा महोत्सव आहे. जिथे गडगडाटात गर्भपिशवी फाटते आणि नाल्यातून जन्म घेतो एक नवा विचार – की विकास हे केवळ शहरांचं मक्तेदारीचं संज्ञा न राहता, तो गडद डोंगरात, झाडांच्या सावलीत, आणि आदिवासी बायांच्या पदराही उमलतो. आणि म्हणूनच, हे रुग्णालय एका बाळंतिणीपेक्षा कमी वेळ न घेता उभं राहिलं, आणि दर बाळाच्या जन्मासोबत ते स्वतः पुन्हा पुन्हा जन्म घेतं आहे – उर्जेच्या नव्या अर्थाने, समर्पणाच्या नव्या अर्थाने, आणि माणसाच्या जीवाला वाचवणाऱ्या अस्सल जिव्हाळ्याच्या अर्थाने.

Lloyd metalLloyds metal hospital