आरोग्य विभागातील मेगाभरती तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी तातडीने मेगाभरती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. २०१८ मध्ये आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या मेरीट लिस्ट मध्ये जे परीक्षार्थीं वेटिंग लिस्टमध्ये होते. त्यांना आताच्या भरतीत पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे ते जालन्यात बोलत होते.

रुग्णवाहिका रुग्णांकडून जास्तीचे दर आकारत असतील तर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी सूचना देखील राजेश टोपे यांनी केली. ऑक्सिजनचे टॅंकर आडवनाऱ्या राज्यांवर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी देखील टोपे यांनी केली आहे. ऑक्सिजन दरांच्या चढउतारासाठी ऑक्सिजनचे टॅंकर दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे गुन्हा करण्यासारखे असल्याचे टोपे म्हणाले.

राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्येचा दर कमी झाला असून काही भागात अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे राज्यभरात कडक लॉकडाऊन लावायचा की नाही हे १५ तारखेच्या दरम्यान ठरवले जाईल असं सांगत ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतच असेल तिथे कडक लॉकडाऊन लावावाच लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे देखील वाचा : 

इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात ३३७ जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिकेत ३०० जागांसाठी भरती

lead storyRajesh Tope