‘एआय’ तंत्रज्ञानाने मानव- वन्यजीव संघर्ष होणार कमी !

वनालगत शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची होईल मदत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : राज्यातील दक्षिण टोकावरील  सर्वात शेवटचा जास्त जंगल व्याप्त, पहाड, दऱ्या, नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला, नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन  गडचिरोलीची ओळख आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून  वाघ, बिबट, अस्वल, हत्तीचा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला. हा संघर्ष आणखी टोकाला जाऊ नये यासाठी वन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ‘आर्टिफिशीअल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात वडसा व गडचिरोली वन विभागातच हत्तींचा वावर राहिलेला आहे, त्यामुळे वनविभागाकडून ‘थर्मल ड्रोन’ कॅमेरा, ‘एआय’ कॅमेरा, लाइव्ह कॅमेरा, ट्रॅप कॅमेरे व नायडर मशीन याचा वापर करून जंगलातील वन्यप्राण्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवता येणार आहे.

या तंत्रज्ञानामुळे वनक्षेत्रात कोणत्या भागात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याचे लोकेशन संबंधित क्षेत्राच्या वनाधिकाऱ्यांकडे जाते. या तंत्रज्ञानामुळे मानव- वन्यजीव संघर्ष टळण्यास मदत होणार आहे. मागील तीन वर्षांपासून  वाघ, बिबट, अस्वल तसेच  रानटी हत्तींच्या कळपामुळे जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचलेला असून  हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या वतीने व्यापक प्रमाणात उपाययोजना राबविल्या जात आहेत; परंतु नागरिकांचे जीवनमान वनावर अवलंबून असल्याने सातत्याने हल्ले होत आहेत. हे हल्ले थांबविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान उपयोगी पडेल.

जिल्ह्यातील  वडसा व गडचिरोली वन विभागातच हत्तींचा वावर राहिलेला आहे. हत्तींच्या लोकेशनसाठी  लोकेशन शोधण्यासाठी व त्यांचा लाइव्ह फोटो घेण्यासाठी ‘थर्मल ड्रोन’ वापरले जात आहेत. तर गडचिरोली वन विभागात चातगाव वन परिक्षेत्रातील आंबेशिवणी येथील कक्ष क्रमांक ४१५ मध्ये ‘एआय’ कॅमेरा प्रस्थापित करण्यात आलेला आहे. सदर कॅमेराची वन्यप्राण्यांच्या हालचालीवर नजर आहे ३५ लाइव्ह कॅमेरे गडचिरोली वन विभागातील विविध जंगल परिसरात स्थापित केलेले आहेत. हे कॅमेरे जंगलातील प्रत्येक हालचालींचे तसेच घडामोडींची माहिती देतात.२०० हून अधिक ट्रॅप कॅमेरे लावलेले असून इन्फ्रारेड लेझर ही प्रणाली युक्त यंत्र लावलेले आहे. हे यंत्र लेझरयुक्त असते. हे लेझार उघड्या डोळ्यांना दिसत नाही, लेझरच्या समोरून एखादा प्राणी गेल्यास मोठ्याने सायरन वाजण्यास सुरुवात होते. त्यामुळे परिसरात नागरिक सतर्क होतात

हे ही वाचा,

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास अधिक गती द्या

गोंडवाना विद्यापीठात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाचे आयोजन

तंत्रज्ञानामुळे मानव- वन्यजीव संघर्ष टळण्यास मदत होणार आहेवन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर 'आर्टिफिशीअल इंटेलिजन्स' (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले