श्रमजीवी कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना मुक्तीची शंभरी साजरी

कोरोनावर मात केलेल्या 88 वर्षीय रुग्ण यशोदा सवरा यांना सन्मानपूर्वक डिस्चार्ज.

या मानवतेच्या कार्यात योगदान देणाऱ्या प्रत्येकाला हा दिवस समर्पित – विवेक पंडित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उसगाव, दि. 5 जून : 1 मे रोजी सुरू झालेल्या श्रमजीवी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना मिळणारे उपचार, दिलासा आणि भावनिक आधार सर्वत्र चर्चेचा विषय आहे, अशातच आज या सेंटर मधून कोरोनावर मात केलेल्या 100 व्या रुग्णाचा डिस्चार्ज झाला.

 

कालपर्यंत 99 रुग्ण कोरोनावर यशस्वीपणे मात करून घरी परतले. आज 100 व्या रुग्णाच्या डिस्चार्ज वेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित स्वतः कोविड सेंटरमध्ये आले. शंभरावी रुग्ण यशोदा रामा सवरा या 88 वर्षीय आजींचा विवेक पंडित यांनी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला आणि त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

यशोदा सवरा या राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री स्व.विष्णू सवरा यांच्या मातोश्री. स्व. विष्णू सवरा यांचे बंधू आणि बहीण यांनीही याच ठिकाणी कोविड उपचार घेऊन आजारावर मात केली. मोठ्या विश्वासाने हे कुटुंब उसगाव येथे उपचारासाठी आले आणि हसत मुखाने आज घरी परतले.

यशोदा सवरा यांच्यासोबत आज तब्बल 13 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. या निमित्ताने आज या महामारीतही एक आनंदाचा दिवस साजरा करण्याची संधी मिळाली, बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्यावरच्या  या समाधानाचे सर्व श्रेय येथील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि या सेंटरसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आहे असे यावेळी विवेक पंडित यांनी सांगितले. यावेळी सर्व रुग्णांना गुलाब पुष्प आणि मिठाई देऊन आरोग्यदायी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या सेंटर मध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि स्टाफचा, स्वयंसेवक यांचा ही सन्मान यावेळी करण्यात आला.

अत्यंत सेवाभावी भावनेने काम करणारे डॉक्टर विनय आणि डॉक्टर वर्षा पाटील या ध्येयवेड्या दाम्पत्याचे विवेक पंडित यांनी विशेष आभार मानले. डॉ. चिन्मयी, डॉ.असिफ, डॉ.रफत, डॉ.सुखदा, डॉ. मयूर यांचाही सन्मान करून आभार मानले. यावेळी विवेक पंडित यांच्या सोबत, श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार,एकलव्य गुरुकुलचे प्रा. दिनेश काटले, महेश धांगडा, मनोज सातवी, ममता परेड, रुपेश जाधव,निलेश चव्हाण, महेश ठाकरे, इत्यादी उपस्थितीत होते. येथे स्वच्छतेसह रुग्णांची विशेष काळजी घेणारे वॉर्ड बॉय सुमित आणि ओमकार यांचा प्रमोद पवार आणि दिनेश काटले यांनी विशेष उल्लेख करून सन्मान केला. या सेंटरसाठी मार्गदर्शन करणारे विविध तज्ञ डॉक्टर आणि दानशूर दात्यांचेही ऋण व्यक्त केले.

हे देखील वाचा :

दिलासादायक!! 7 जूनपासून महाराष्ट्र अनलॉक, पाच टप्प्यात हटणार लॉकडाऊन!

इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात ३३७ जागांच्या भरतीसाठी मुदतवाढ

बहुजन म्हणजे कोण : नवे संदर्भ, नवे अर्थ

 

lead storyManoj SatviVivek Pandit