मी नेहमी काम करत असतो आणि कामाच्या माध्यमातून माझी भूमिका मांडत असतो- खासदार राजेंद्र गावीत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वसई विरार, 23 जून – ‘खासदार आपल्या दारी ” या कार्यक्रमांतर्गत वसई तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्युत विभागातील समस्या सोडविण्यासाठी विद्युत विभागातील अधिकाऱ्यांसोबत जनतेची बैठक आयोजित केली होती .तेव्हा आपल्या भाषणात खासदार राजेंद्र गावित म्हणाले. “मी कोणावर टीका करत नाही कोणाविषयी वाईट बोलत नाही माझ्या कामाच्या माध्यमातूनच मी उत्तर देत असतो ” यावेळेस विद्युत वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता वसई विभाग  संजय खरांदे ,कार्यकारी अभियंता  सुटे माणिकपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक  संपतराव पाटील उपस्थित होते जनतेने आपल्या समस्या मांडल्या प्रत्येक समस्येला वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिले महत्त्वाचे विषय ग्रामीण भागात सातत्याने वीज जात असते जुने झालेले ट्रान्सफॉर्मर व जुन्या झालेल्या विद्युत वाहिन्या याबाबत तक्रारी होत्या तसेच मीटर बिघडल्यावर ती नवीन मीटर उपलब्ध नाहीत असे जनतेने सांगितले खासदारांनी त्वरित नवीन मीटर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले व त्या पद्धतीने येथे आठ दिवसात यांची मीटर बिघडले त्यांना नवीन मीटर मिळण्याची शक्यता वाढली आहे भरमसाठ येणाऱ्या बिलाबाबत चर्चा झाली अधिकाऱ्यांनी ती तपासून करेक्ट करून देण्याचे आदेश खासदारांनी दिले जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नाविषयी बैठक आयोजित केल्यामुळे जनतेने खासदार गावित साहेबांचे आभार मानले व विविध विभागाच्या ही अशाच बैठक आयोजित करावे अशी मागणी केली.

वसई विरार कारणासाठी खासदार गावित यांनी दिली खुशखबर

जून महिना संपण्यापूर्वी प्रतीक्षेत असलेले 90 एमएलडी पाणी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील जनतेला मिळणार आहे अशी खुशखबर खासदार राजेंद्र गावित साहेब यांनी दिली. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून पाणी समस्येला तोंड देणाऱ्या वसई विरार नालासोपारा येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अगदी वसईतील शेवटचा टोक वैतरणा ते नायगाव विरार नालासोपारा वसई अशा सर्व भागातील जनता येथे आली होती या कार्यक्रमात शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे वसई जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ, विनायक निकम, मनोज पाटील, सुरेश चौधरी जितेंद्र शिंदे आणि अजित खांबे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा :-