मी सिमा प्रश्नासाठी हुतात्मा व्हायला तयार – संजय राऊत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई  29 नोव्हेंबर :- बेळगाव कोर्टाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी समन्स बजावले असून १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देतांना संजय राऊत म्हणाले की, हा एक मला कट असून माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. हे मोठे कारस्थान असून मला अटक करण्याची कर्नाटक सरकारची तयारी आहे. तरीही मी माझ्या सीमा बांधवांसाठी बेळगावला जाणार. कारण महाराष्ट्र हा झुकणारा नाही.

सीमा प्रश्नासाठी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ३ महिने तुरुंगवास भोगला. तीन दिवस मुंबई पेटत होती. बेळगावसाठी महाराष्ट्राने ६९ हुतात्मे दिले, मी ७० वा हुतात्मा होण्यास तयार आहे. असेही त्यांनी पुढे सांगितले.

दरम्यान भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी राऊतांच्या या प्रतिक्रियेवर भाष्य केले आहे. दरेकर म्हणाले की, राऊताना कशाला अटक होईल ? ते प्रसिध्दीच्या हव्यासापोटी अशी विधाने आहेत,नॅशनल लेव्हलला त्यांना प्रसिध्दी हवी असते.

हे पण वाचा :-

bedgaon problemMP sanjay raut