लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर :– दि. १७ : बल्लारपूर विधानसभासाठी उभे असलेले भापजचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारा साठी बल्लारपूर येथे साऊथ चे सिनेअभिनेता व आंध्रा प्रदेशाचे उप मुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हजेरी लावली त्यांना ऐकण्या व मागण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली .
पांडुरंगाच्या वारी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात मला येण्याची संधी मिळाली त्यामुळे मला आनंद झाला , वीरांची भूमी शाहूची भूमी , शिवरायांची पावन भूमीला मी नमन करतो तसेच माझे आदर्श बाळा साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राला ही मी नमन करतो .
माझे आदर्श बाळा साहेब ठाकरे यांच्या विचाराला जिवंत व त्यांच्या आदर्शवर चालणारी ही महायुती ची सरकार आहे. मागील दहा वर्षात एनडीए सरकारनी भारताला जगाच्या अर्थ व्यवस्थेत भारताला जो सन्मान व आधार दिला आहे.
मागील दहा वर्षांत बल्लारपूर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार नी जे विकास कामे केली ते तुमच्या साठी मोठी उपलब्धी आहे… महायुती व जन सेना चे विचार हे सनातन रक्षे ची सैनिक आहे असल्याचे यावेळी ते बोलत होते .मराठी मी शिकत आहे बोलण्यात काही चुका झाल्यास मला शमा करावं आणि मुनगंटीवार ला विजय करावे अशी विनंती केले