अमरावती भागात निंभोरकर निवडून आल्यास शिक्षकांच्या सात समस्या 100 दिवसात पृर्ण करणार, आ. कपिल पाटिल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती डेस्क २६ नोव्हेंबर :- अमरावती विभागात होत असलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकी मध्ये शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार दिलीप निंबाळकर यांचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने शंभर दिवसात विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार देण्यास भाग पाडणार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व जुनी पेन्शन योजना लागू करणार.

सावित्री फातिमा शिक्षक कुटुंब आरोग्य योजना राबवणार, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रक्कम मिळून देणार,सामाजिक न्याय विभागातील अपंग शाळा शाळेत मधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळवून देणार कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळून देणार अशा घोषणा शिक्षक भारती संघटनेच्या जाहीरनाम्यात शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ जाहीर केले.