लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 23 जानेवारी:- 130 वर्षे जुन्या असलेल्या डॉ. सायरस पुनावाला हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कॅम्प आणि डॉ. सायरस पुनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर, कॅम्प यांच्या दोन्ही संस्थाचे नामकरण जावडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कँम्प एज्युकेशन सोसायटी ने पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. तर अशा संस्थेच्या माध्यमातून स्किल इंडियाचे धडे दिले जात ही महत्त्वाची बाब आहे. कमी कालावधीत चांगले स्किल घेऊन रोजगार प्राप्त यातुन होतय. यातुन मोदीनी सुरू केलेल्या स्किल इंडिया असो वा इतर योजना याला यश मिळतय ही कौतुकाची बाब आहे अस मत प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केल.
या दोन्ही संस्था करता सायरस पुनावाला यांनी सहा कोटींची मदत केली.चांगल्या मार्गाने पैसा कमावुन चांगल्या कामाकरता देण यातही उदार मत असावे लागते.पुनावाला यांनी जी कोविशिल्ड लस तयार केली .तो भाग आत्मनिर्भरचाच असुन या लसी फायदा आपल्या देशासह इतर देशांना होत आहे, ही चांगली बाब आहे.
चांगल्या शिक्षणामुळे त्या विद्यार्थ्यांचे पुर्ण जीवन बदलत असते.आणि असे चांगले शिक्षण या संस्थेतुन दिले जाते.अटल टिंकरिंग लँबच्या माध्यमातून नविन कल्पना समोर येत असुन शिक्षण संस्थानी याकरता पुढे आले पाहिजे असे ते बोलत होते.