लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली – नगरपरीषद आरमोरीचे स्वच्छता व पाणी पुरवठा कंत्राटाच्या करारनाम्याची अट क्रमांक १२ ची पूर्तता करण्याकरीता कसुर केल्याप्रकरणी स्वघ्छता व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नितीन गौरखेडे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन चे सचिव अक्षय भोयर यांच्या नेतृत्वात सफाई कामगारांनी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजस्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपरीषदेनी १४ व्या वित्त आयोगातुन घनकचरा व्यवस्थापन संकलन वाहतूक व प्रक्रिया या कामाची निविदा कंत्राटदार दिपक उत्तराधी अमरावती यांना मंजुर केलेली आहे.
सदर कंत्राटदाराच्या करारनामेमध्ये अट क्र.१२ मध्ये मजुरांना किमान वेतन कायद्यानुसार मजुरांना वेतन देणे अनिवार्य राहिल, मजुरांचे वेतन त्यांच्या वैयक्तिक बॅंक खात्यात अदा केल्या समधी बॅकेचा पुरावा तसेच मजुराचा काढलेला इ.पी.एफ.भरणा करून चालनची प्रत सादर केल्या नंतरच कंत्राटदाराचे बिल अदा करण्यात येईल, असे नमुद केलेलें आहे.
परंतु साफसफाई मजुरांना किमान वेतन कायद्याप्रमाणे मंजुरी मिळत नसल्याचे व वेतन वैयक्तिक बॅंक खात्यात अदा करीत नसल्याने मजुरानी अट क्रमांक १२ ची पूर्तता करण्यात यावी. या संबंधी नगरषरीद मुख्याधिकारी यांना यापूर्वी मागणी चे निवेदन दिलेले आहेत. परंतु नगरपरीषद प्रशासनाने करारनामेतील अट क्रमांक १२ ची पूर्तता होत आहे की नाही. याची शाहानिशा करणे व त्या प्रमाणे वेतन काढण्याचा प्रस्ताव तयार करणे हे नगरपरीषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नितीन गौरखेडे याचे कर्तव्य होते. परंतु त्यांनी मुद्दाम हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून कत्राटदाराशी संगनमत करून मजुरांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे त्यांनी आपल्या प्रामाणीक पणात व नियत कर्तव्यात कसुर केलेली असुन, या बाबीची दखल घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरीषद आरमोरीचे स्वच्छता व पाणी पुरवठा कंत्राटाच्या करारनाम्याची अट क्रमांक १२ ची पूर्तता करण्याकरीता कसुर केल्याप्रकरणी स्वघ्छता व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नितीन गौरखेडे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन चे सचिव अक्षय भोयर यांच्या नेतृत्वात सफाई कामगारांनी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजस्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी पुषोत्तम बलोदे, स्वनिल राऊत, गुरुदास मेत्राम, गुणवंत रामटेके, राजेश मुन, राजु नागदेवे, सुनिल मेत्राम, अविनाश उके, मनोहर कांबळे, उमेश रामटेके, रमेश मने, रीना बाबोळे, रेखा काबळे, कुसुम मेत्राम, प्रज्ञा खरकाटे, रशिका मेत्राम, साधना गजभिये, सुरेखा मेत्राम, गिता मेत्राम, वर्षा खेडकर, सुनिता टेंभुर्णे, वर्षा गुरुनुले, शिला रामटेके, उर्मिला कुमरे, गिता सडमाके आदि उपस्थित होते.
हे देखील वाचा :
मनुष्यवस्तीत शिरला मध्यरात्री बिबट्या; बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद
12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवाड यांची महत्त्वाची माहिती
12 दिवसात तब्बल 2 रुपयांनी महागलं इंधन, अनेक शहरात पेट्रोलचे दर 105