गडचिरोली विधानसभा आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार

आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : निवडणुकिच्या दिवशी संपूर्ण जिल्हयात किरकोळ आजाराच्या 46 रुग्णांना उपचार करण्यात आले.प्रत्येक बूथ वर आरोग्य सेवक, सेविका,आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित राहून सेवा दिली.आरोग्य विभागाच्या तत्परते मुळे मतदारांना व मतदान यंत्रणेला मतदान प्रक्रिया सुरळित पार पडण्यास मदत झाली. तसेच अहेरी येथील मतपेट्या संकलन केन्द्रावर वैद्यकिय पथक तैनात करण्यात आले आहे.

पोलिस पथक, निवडणूक कर्मचारी, अधिकारी असो वा रांगेत उभा राहणारा मतदार आज मग कुणालाही त्रास झाला तेव्हा जिल्हा नियंत्रण कक्ष व तालुका नियंत्रण कक्ष यांचे समन्वयाने तालुकास्तरीय शिघ्र प्रतिसाद पथक. प्रा आ केंद्र स्तरावरील शिघ्र प्रतिसाद पथक यांचे व्दारे रुग्णांना त्वरीत आरोग्य सेवा देण्यात आल्या.

मागील कित्येक दिवसापासुन विविध स्तरावारुन  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे व्दारे वैद्यकिय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सीएचओ, मानसेवी वैद्यकीय, औषध निर्माण अधिकारी यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेण्यात आले होते. तसेच दिनांक 14 नोव्हेंबर ते 17नोव्हेंबर या कालावधीत आरोग्य विभागातील 468 जणांनी पोस्टल बॅलेट द्वारे मतदानाचा हक्क बजावून निवडणूक कर्तव्यावर रुजू झाले.