माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची महत्त्वपूर्ण घोषणा – सांस्कृतिक, औद्योगिक आणि आयटी क्षेत्रात मोठे निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

छत्रपती संभाजीनगर – माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत विविध महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. राज्यातील शास्त्रीय संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जाते. दरमहा ५,००० रुपये अशी दोन वर्षांसाठी ही योजना असते. त्याच प्रमाणे, महाराष्ट्रीय लोककला आणि लोकवाद्य शिकणाऱ्या २४ विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत प्रत्येकी ५,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे अशी घोषणा आशीष शेलार यांनी छत्रपती संभाजीनगराहतील पत्रकार परिषदेत केली

औद्योगिक क्षेत्रात, राज्यात ड्रोन निर्मिती कंपन्या येण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लवकरच अशा प्रस्तावांची अपेक्षा आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. संभाजीनगरला लवकरच ड्रोन – आयटी क्षेत्रात मोठी गुंतवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने संभाजीनगर येथील ओरिक सिटीमध्ये ड्रोन हब तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून ड्रोन उत्पादन कंपन्या येथे येण्याचा मार्ग मोकळा होईल.

सायबर सुरक्षेचा मुद्दा फक्त नॅशनल बँकांपुरता मर्यादित नसून, व्यापक पातळीवर त्यावर लक्ष दिले जाणार आहे, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, सर्व विभागांमध्ये प्रगती साधण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विशेषतः, राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) साठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठीही टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.

शालेय परीक्षांमध्ये विद्यार्थिनींनी बुरखा घालून प्रवेश देण्यात येऊ नये, या नितेश राणेंच्या मागणीवर भाष्य करताना शेलार यांनी यासंदर्भात म्हणाले की, सरकार म्हणून ते बोलले असते तर मी बोललो असतो, मात्र त्यांचं मतं त्यांनी मांडले. तसेच याबाबत नितेश राणे उत्तर देतील, असे सांगितले. तसेच, जर याबाबत शासन निर्णय (GR) असेल, तरच मी बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेश नाईक यांच्या ‘कमळ पर्याय’ वक्तव्यावर भाष्य करताना शेलार म्हणाले, त्यांचे पूर्ण भाषण ऐकल्यास त्याचा संदर्भ स्पष्ट होईल. तसेच, (उद्धव ठाकरे गट) चे नेते पंतप्रधान होणार असे म्हणतात, तर गणेश नाईकही आपल्या भूमिकेबाबत मत मांडू शकतात, असे त्यांनी सांगितले.

तसेच, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लवकर व्हाव्यात अशी सरकारची इच्छा आहे, असेही शेलार यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत मंत्री शेलार यांनी संस्कृती, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकास या क्षेत्रांमध्ये सरकारचे निर्णय राज्याच्या प्रगतीसाठी मोठा टप्पा ठरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले