शक्ती कायद्यासंदर्भात मुंबईतील महिला व वकील संघटनांकडून महत्वपूर्ण सूचना – गृहमंत्री अनिल देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. 19 : शक्ती कायद्यासंदर्भात आज विधानभवन येथे संयुक्त समितीसमोर मुंबईतील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्वपूर्ण सूचना व निवेदन प्राप्त झाले असून समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल, असे या संदर्भातील समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

या बैठकीत उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे तसेच विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत व इतर सदस्य उपस्थित होते.

मुंबईतील जवळपास 46 महिला व वकील संघटनांकडून सूचना, निवेदन प्राप्त झाले होते. त्यांच्या प्रतिनिधींनी समितीसमोर सुचना मांडल्या. या समितीची पुढील बैठक औरंगाबाद येथे दि. 30 जानेवारी, 2021 रोजी होणार असून त्याठिकाणी देखील महिला व वकील संघटनांकडून सूचना व निवेदन स्विकारले जाणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

Anil Deshmukh