गडचिरोली जिल्ह्यात आज ४१ नवीन कोरोना बाधित तर ३९ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २० मार्च: आज जिल्हयात ४१ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०१०९ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9698 वर पोहचली. तसेच सद्या ३०३ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १०८ मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ३.०० टक्के तर मृत्यू दर १.०७ टक्के झाला.

नवीन ४१ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, अहेरी ४, आरमोरी तालुक्यातील २, भामरागड तालुक्यातील ४, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली तालुक्यातील १, कुरखेडा १, मुलचेरा १, तर वडसा तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 39 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील २४, अहेरी २, आरमोरी ६, सिरोंचा १, तर वडसा मधील ६ जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी वार्ड ३, गुलमोहर कॉलनी १, विवेकानंदनगर १, सुयोगनगर नवेगाव १, गणेशनगर १, जिल्हाधिकारी कार्यालय ४, शिवाजी सायंश कॉलेज १, स्थानिक २, गोकुलनगर १, साईनगर १, युनियन बँक जवळ धानोरा रोड १, कॅम्प एरिया १, आशिर्वादनगर १, कलेक्टर कॉलनी १, गणेशनगर १, बाजारपेठ एरिया १, रेड्डी गोडाऊन चौक १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली ३, गफुर मोहल्ला १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, वैरागड १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये एल.बी.पी. हेमलकसा ३, स्थानिक १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस स्टेशन येरकड १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये हेडरी १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये गुरनोली १, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये एन.एस.सी. ज्यु. कॉलेज सुंदरनगर १, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्ड १, कस्तुरबा वार्ड १, आमगाव १, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये १ जणांचा समावेश आहे.

Gadchiroli Corona Report News Today