गडचिरोली जिल्ह्यात ११ मृत्यूसह आज ४३४ नवीन कोरोना बाधितांची भर तर १८३ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १६ एप्रिल: आज जिल्हयात ४३४ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज १८३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १४०१९ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ११२४९ वर पोहचली. तसेच सद्या २५८५ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १८५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज ११ नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील कुरखेडा येथील ६४ वर्षीय पुरुष, आरमोरी ता. कारागोटा ५६ वर्षीय महिला, आरमोरी येथील ६७ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, धानोरा ५२ वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. चिमूर येथील ७२ वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. ब्रम्हपूरी ५० वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. सिदेवाही ६१ वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. ब्रम्हपूरी ७५ वर्षीय पुरुष, गोकूल नगर गडचिरोली ५६ वर्षीय महिला, भंडारा ता. कुडेगांव ८७ वर्षीय पुरुष, इ.चा मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.२४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १८.४४ टक्के तर मृत्यू दर १.३२ टक्के झाला. 

नवीन ४३४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १६५, अहेरी तालुक्यातील ६८, आरमोरी ३३, भामरागड तालुक्यातील १४, चामोर्शी तालुक्यातील २०, धानोरा तालुक्यातील २१, एटापल्ली तालुक्यातील १७, कोरची तालुक्यातील १२, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये १७, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ४, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ०९ तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ४२ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या १८३ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ७५, अहेरी १४,  आरमोरी १४, भामरागड ११, चामोर्शी ८, धानोरा ०९, एटापल्ली ०७, मुलचेरा ३, सिरोंचा ५, कोरची ४, कुरखेडा ६, तसेच वडसा २७ येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये १२ जणांचा समावेश आहे.

Gadchiroli Corona