गडचिरोली जिल्ह्यात 17 मृत्यूसह आज 611 कोरोनामुक्त तर 427 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आज जिल्हयात 427 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 611 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 24587 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 19687 वर पोहचली. तसेच सद्या 4394 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 506 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 17 नवीन मृत्यूमध्ये 47 वर्षीय पुरुष देलोडो ता.आरमोरी, 60 वर्षीय महिला आलापल्ली ता.अहेरी, 55 वर्षीय महिला अंकिसा ता.सिरोचा , 40 वर्षीय पुरुष मुर्झा ता.गडचिरोली, 65  वर्षीय पुरुष कोरेगाव ता.वडसा, 72  वर्षीय पुरुष वडसा, 52 वर्षीय पुरुष ता.शिंदेवाही जि.चंद्रपूर, 52 वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, 64 वर्षीय पुरुष लेढारी ता.कुरखेडा, 50 वर्षीय पुरुष कॉम्प ऐरिया गडचिरोली, 54 वर्षीय पुरुष अंकिसा ता.सिरोंचा, 28 वर्षीय पुरुष मेढेवाडी ता.आरमोरी, 40 वर्षीय महिला महागाव ता.अहेरी, 45 वर्षीय पुरुष हेटीनगर ता.कुरखेडा, 40 वर्षीय पुरुष घारगाव ता.चामोर्शी, 50 वर्षीय महिला श्रीरामनगर कुरखेडा  यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.07 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.87 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला.

 

नवीन 427 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 146, अहेरी तालुक्यातील 30, आरमोरी 44, भामरागड तालुक्यातील 18, चामोर्शी तालुक्यातील 50, धानोरा तालुक्यातील 20, एटापल्ली तालुक्यातील 17, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 28, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 09, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 39 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 22 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 611 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 178, अहेरी 36,  आरमोरी 43, भामरागड 18, चामोर्शी 33, धानोरा 25, एटापल्ली 36, मुलचेरा 22, सिरोंचा 50, कोरची 42, कुरखेडा 41 तसेच वडसा येथील 87 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

गडचिरोली जिल्ह्यात बारा कोविड नियंत्रण कक्षातून मदतीचा हात

चवताळलेल्या हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्यलेखापाल ठार तर सहाय्यक वनसंरक्षक थोडक्यात बचावले!

Gadchiroli Coronalead story