गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन कोरोनाबाधितांची संख्या शून्य

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 27 जानेवारी: गडचिरोली जिल्हयात आज एकही नवीन कोरोना बाधित आढळून आलेले नाही. तसेच आज 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9335 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9175 वर पोहचली. तसेच सद्या 55 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.29 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.59 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला. आज कोरोनामुक्त झालेल्या 4 रूग्णांमध्ये गडचिरोली 2, एटापल्ली 2 जणाचा समावेश आहे.

Gadchiroli Corona