गडचिरोली जिल्ह्यात आज २ मृत्यूसह 104 कोरोनामुक्त, तर 44 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि. ६ जून : आज जिल्हयात 44 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29640 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28420 वर पोहचली. तसेच सद्या 493 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 727 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 2 नवीन मृत्यू यामध्ये रा. मार्कंडा हेटी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, तर रा. वेलगुर ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 80 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.88 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.66 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.

नवीन 44 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 11, अहेरी तालुक्यातील 02, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 09, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 02, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 06, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 04 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 02 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 104 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 21, अहेरी 04,  आरमोरी 05, भामरागड 09, चामोर्शी 22, धानोरा 00, एटापल्ली 01, मुलचेरा 10, सिरोंचा 11, कोरची 02, कुरखेडा 04 तसेच वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यात एकाचवेळी १ हजार ठिकाणी करणार आंदोलन

स्पुतनिक लसीच्या साठा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होणार : राजेश टोपे

SBI ग्राहकांना बँकेत आता फक्त ‘ही’ चार कामं करता येणार

 

Gadchiroli Coronalead story