गडचिरोली जिल्ह्यात आज 11 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 17 जानेवारी: आज जिल्हयात 11 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9277 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9049 वर पोहचली. तसेच सद्या 123 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.33 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.

नवीन 11 बाधितांमध्ये गडचिरोली 3, अहेरी 1, आरमोरी 0, भामरागड 1, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 0, मुलचेरा 1, सिरोंचा 0, व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 13 रूग्णांमध्ये गडचिरोली 4, अहेरी 1, आरमोरी 2, भामरागड 0, चामोर्शी 2, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 1, व वडसा मधील 3 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील पोलीस हेड क्वार्टर 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ प्राणहिता 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये कोठी 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये बोदुलदंड 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्ड 3, स्थानिक 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.

Gadchiroli Corona