गडचिरोली जिल्ह्यात आज 134 कोरोनामुक्त, 5 मृत्यूसह 83 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 
गडचिरोली, दि. 26 मे :
आज जिल्हयात 83 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 134 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28989 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26819 वर पोहचली. तसेच सद्या 1466 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 704 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 5 नवीन मृत्यूमध्ये हेटी ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, चामोर्शी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय पुरुष, येरांडी ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय पुरुष, मोहझरी ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 48 वर्षीय पुरुष, चंद्रपूर जि. चंद्रपूर येथील 55 वर्षीय महिला यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.06 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

नवीन 83 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 21, अहेरी तालुक्यातील 4, आरमोरी 6, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 4, एटापल्ली तालुक्यातील 5, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 2, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 10, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 10 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 134 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 50, अहेरी 3, आरमोरी 13, भामरागड 00, चामोर्शी 26, धानोरा 1, एटापल्ली 4, मुलचेरा 18, सिरोंचा 3, कोरची 5, कुरखेडा 7 तसेच वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

कोरोनाच्या संकटकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

corona gadchiriolilead story