गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 16 नवीन कोरोना बाधित तर 40 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 24 : आज जिल्हयात 16 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 40 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8872 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8500 वर पोहचली. तसेच सद्या 272 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 100 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. दोन नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील 73 वर्षीय पुरुषाचा समावेश ती व्यक्ती एचटीएन मधुमेहाने व पॅरालिसिसने ग्रस्त होती तर रा.सिदेंवाही जि. चंद्रपूर येथील 55 वर्षीय महिला अस्थमा व एचटीएनने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.81 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.07 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.

नवीन 16 बाधितांमध्ये गडचिरोली 11, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 1, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 40 रूग्णांमध्ये गडचिरोली 16, अहेरी 9, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 6, धानोरा 2, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 1, कोरची 1, कुरखेडा 3 व वडसा मधील 1 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील विसापूर 2, आयटीडीपी कॉलनी 1, प्रकल्प कार्यालय 1, देवापूर 1, चामोर्शी रोड 2, कन्नमवार वार्ड 2, कॅम्प एरिया 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये एलबीपी शाळेजवळ हेमलकसा 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये धर्मापूर 1, स्थानिक 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मालेवाडा 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.