गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 24 कोरोनामुक्त, तर 26 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 16 जून : आज जिल्हयात 26 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 24 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29978 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28930 वर पोहचली. तसेच सद्या 311 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 737 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एक नवीन मृत्यूमध्ये ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.  यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.50 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.04 टक्के तर मृत्यू दर 2.46 टक्के झाला.

नवीन 26 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 07, अहेरी तालुक्यातील 02, आरमोरी 04, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 04, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 01, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 02 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 02 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 24 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 11, अहेरी 00,  आरमोरी 01, भामरागड 00, चामोर्शी 03, धानोरा 00, एटापल्ली 01, मुलचेरा 00, सिरोंचा 03, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 05 जणांचा समावेश आहे.

 

हे देखील वाचा :

कोविड-१९ लस घेण्यासाठी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये व्यंकटापूर उपपोलिस स्टेशनच्या पुढाकाराने जनजागृती

आरेंदा येथे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन

उपविभागीय कार्यालय देसाईगंज येथे समतादूत प्रकल्पाच्या वतीने वृक्षारोपण

Gadchiroli Coronalead story