फेब्रुवारीच्या मध्यावर सरपंचांच्या हाती गावगाडा कारभारी तयार, उपसरपंच देखील निवडले जाणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा, दि. 25 जानेवारी : सरपंच पदांचे आरक्षण ठरविण्याच्या हालचाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांची निवडणूक पार पडणार असल्याने जिल्हावासीयांचे लक्ष या निवडणूकीकडे लागून आहे. आरक्षण कसे राहणार हा गुलदस्ता असला तरी 95 टक्के सरपंच आरक्षण पूर्वीचेच राहणार असा रंगारंग आहे. त्यानंतर म्हणजे फेब्रुवारीच्या 15 तारखेच्या आत सरपंच निवडल्या जाऊन गावगाड्याचा कारभार सरपंचांच्या हाती जाणार अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव महिनोगणती असलेला लॉकडाउन, ओला दुष्काळ, उध्वस्त खरीप हंगाम, 50 पैश्यापेक्षा कमी पीक पैसेवारी या प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतीच्या 4805 जागासाठीच्या निवडणूक पार पडल्या, मात्र यामुळे राजकारणी व मतदारांचा जोश, उत्साह, झंझावाती प्रचार, पैश्याचा व मद्याचा महापूर, यावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट हे सर्व विसरून सर्व जण लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी झालेत. आता सदस्य, गावपुढारी, कार्यकर्ते, 10 लाखांवर मतदार व ग्रामस्थ यांचे लक्ष 27 व 29 तारखेला निघणार्‍या सरपंच आरक्षण सोडतीकडे लागले आहे. मात्र जाणकारांचे लक्ष त्यापलीकडे म्हणजे सरपंच निवडणुक निवड कधी होतें याकडे लागले आहे. आरक्षण काहीही निघो सत्ता आपलीच हवी या जिध्दीने आता राजकारणाचे डावपेच खेळले जात आहे.

दरम्यान निवडणूक मतदानानंतर लवकरात लवकर तथापी 30 दिवसांच्या आत घेणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आहे.