नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणीच पाणी, जनजीवन झाले विस्कळीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर :  गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं गुरुवारी पहाटे पासूनच धूँवाधार बॅटिंग केल्याने नागपूरकर सुखावले. पहाटे चार पासूनच रिमझीम पावसाला सुरुवात झाली. नागपूर शहर आणि परिसरात सर्वदूर मान्सून सक्रिय झाल्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
तोवर परिसरात धुँवाधार बरसलेल्या पावसाने अनेक वस्त्या लमय केल्या. सखल भागांत पावसाचे पाणी जमा झाल्याने जनजीवन पूर्णत: ठप्प झाले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्यात आले आहेत.

या रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न झाल्याने या रस्त्यांवरही गुडघाभर पाणी जमा झाले. त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्ते शोधत गल्ली बोळातून मार्ग काढावा लागला.

एअरपोर्ट, प्रतापनगर, रेल्वे स्टेशनजवळील गणेश टेकडी, छत्रपती चौक, वर्धा रोड, नरेंद्र नगर, नंदनवन, हिवरी नगर, धरमपेठ, रामदासपेठ, रामनगर, श्रीकृष्ण नगर, मानेवाडा रिंगरोड, बेसा, बेलतरोडी अशा अनेक वस्त्या पावसाच्या पाण्याने जलमय झाल्या. वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने तलाव सदृष्य परिस्थिती पहायला मिळाली.

हे देखील वाचा :

भारतीय हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; नागपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट

भीषण अपघात! दोन दुचाकींची समोरासमोर धडक, १० वर्षीय बालकासह ५ जणांचा जागीच मृत्यू

 

 

heavy rainlead storynagpur