गोंदिया जिल्ह्यातील चुरडी या गावात घडलं हत्याकांड.
गोंदिया, दि. २१ सप्टेंबर : तिरोडा तालुक्यातील चुरडी गावात बिसेन कुटुंबातील चार लोकांचा अचानक मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ माजली असून हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होऊ शकले नाही.
सदर कुटुंबातील मृतकामध्ये मालता रेवचंद बिसेन (४५) तेजस रेवचंद बिसेन (१९) रेवचंद डोंगरु बिसेन (५१) पौर्णिमा बिसेन (२०) यांचा समावेश आहे. मृत्यूचे कारण अद्याप कळु शकले नसल्याने हत्या की आत्महत्या स्पष्ट होऊ शकले नाही मात्र सदर बिसेन कुटुंबातील एक व्यक्ती गंभीर जखमी असुन त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलीस विभागांना घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन अधिक तपास तिरोडा पोलीस करीत आहे.