जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दहा हजार आरोग्य कर्मचार्यांना लस देणार

जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ विवेक खतगावकर यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. १९ डिसेंबर: पहिल्या टप्प्यात जालना जिल्ह्यातील दहा हजार आरोग्य कर्मचार्यांना लस देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली. कोरोनावरील लस आता दृष्टीपथात आहे.. त्यामुळं जिल्ह्यात सर्व प्रथम आरोग्य यंत्रञसह अंगणवाडी, आशा वर्कर यांना देण्यात येणार आहे..पहिल्या टप्प्यात साधारणतः जवळपास दहा हजार फ्रंटलाईन वर्कर्स ला कोविड 19 लसीकरण करणार असून कोविन अँप मध्ये आजपर्यंत 7000 कर्मचाऱ्यांची यादी समाविष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विवेक खतगावकर यांनी दिली.

कोविड लसीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यात 206 आरोग्य सेविका कायमस्वरूपी कार्यरत असून 60 कंत्राटी आरोग्य सेविका कार्यरत आहेत.त्याच्यासोबत महिला आरोग्य सहाय्यीका कार्यरत असून यांच्या मार्फत आपण ही लसीकरण मोहीम राबविणार असल्याचे ही जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले.यानंतर जर काही मोठ्या प्रमाणात मोहीम राबवायची असेल त्या ठिकाणी आपण खाजगी आरोग्य सेविका, आरोग्य अधिपरिचारिका यांना सुद्धा या मोहिमेत समाविष्ट करून घेणार असल्याचे ते म्हणाले.