आरमोरीत आ.आरमोरीत आ. रामदास मसराम यांच्या जनता दरबारात जनतेचा आवाज दुमदुमला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: जिल्ह्यातील आरमोरीत तब्बल दोन दशकांनंतर प्रथमच पुढाकाराने झालेला ‘जनता दरबार’ हा लोकशाहीतील लोकसंपर्काचा अस्सल नमुना ठरला. आरमोरी तहसील कार्यालयात पार पडलेल्या या ऐतिहासिक उपक्रमात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी पावसाच्या तडाख्यालाही न जुमानता प्रशासनासमोर आपले प्रश्न मांडले. शासनाच्या अनेक योजनांमध्ये अपारदर्शकता, कार्यवाहीतील दिरंगाई, आणि अधिकार्‍यांची उदासीनता यामुळे वाढलेल्या समस्या ऐकून आमदार मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देत, सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

जल जीवन मिशन अंतर्गत पावसात गढुळ पाण्याचा पुरवठा, अनेक गावांचा बंद पाणीप्रश्न, सिंचनासाठी अपुरा वीजपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवांचा अभाव, बी-बियाण्याचा तुटवडा, सौर पंपासंदर्भातील रखडलेली प्रकरणे, पीक विम्याचे अपूर्ण लाभ, प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रमाणपत्र, वसाहतींमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी, बीएसएनएल नेटवर्कचा अभाव, तसेच स्वच्छ भारत योजनेच्या लाभापासून तीन वर्षांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची व्यथा — अशा विविध मुद्द्यांनी जनता दरबाराची सभा गहजबून गेली.

Armori Vidhan Sabha constituencyCongress janata darbarJanta Darbar