…या गावात मादी बिबटयासह तिच्या पिल्यांचे वावर; वनविभागाने दिला सतर्कतेचा ईशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

भंडारा : जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरातील चकारा गावात प्रमोद कोचे यांच्या घरातील अंगणात चक्क बिबटयाच्या पावलाचे ठसे आढळले. त्यामुळे या गावात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रमोद कोचे यांच्या घरातील अंगणात केवळ एका बिबटयांचे नाही तर चक्क आठ ते दहा लहान मोठ्या आकाराच्या बिबट्यांचे पावलाचे ठसे आढळले आहे. दरम्यान अड्याळ वनविभागाच्या पथकाने चकारा गावात भेट देऊन पावलांच्या ठशांची शहानिशा करून गावकऱ्यांना सावध केले आहे.

मागील महिन्यात चकारा येथील पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बिबटयाचा बछड़ा आढळून आला होता. काल सायंकाळच्या सुमारास मादी बिबट त्या पिलाला तोंडात घेऊन जंगलाच्या रस्त्याने जातांनाचा व्हिडीओ तेथील लावलेल्या ट्रैप कॅमेरात दिसून आली.

त्यामुळे चकारा गावात संध्याकाळी ५ वाजेच्या नंतर घराबाहेर न पडण्याचा सूचना वनविभागाने दिल्या असून अत्यावश्यक काम असल्यास तीन-चार लोकांनी हातात काठ्या सोबत घेऊन जाणाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लॉकडाउन मुळे नाही तर बिबटयाच्या परिसरातील वावरमुळे चकारा गावात संध्याकाळी सुनसान वातारण दिसणार आहे.

हे देखील वाचा :

नागेपल्ली येथील पोलीस कर्मचारी हत्याप्रकरण: पत्नी व मुलीनेच रचला हत्येचा कट, सुपारी देऊन केली हत्या

खा. अशोक नेते यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप

महाराष्ट्र शासनात 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त – अनिल गलगली

 

adyalbibatlead story