लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि., 10 ऑक्टोबर : अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत ग्रामपंचायत आलापल्ली येथील ६ प्रभागात सिमेंट रस्ता,नाली समाज मंदिरचे दि.९ आँक्टोबर रोज शनिवार ला आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण झाले असून नागरिकांच्या मूलभूत गरजा व गावातील विकास करण्यासाठी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी २५-१५ या योजने अंतर्गत आलापल्ली शहरात अंदाजे ६० लाख रुपयांची निधी दिली व सदर विकास कामांचे उद्घाटन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आलापल्ली शहरात प्रत्येक वार्ड हा प्रकाशमय राहावे या करीता ६ हाँयमास्ट सुद्धा लावण्यात आले हे सर्व विकासकामे आमदार धर्मरावबाबा आत्राम तसेच महिला नेतृत्वात प्रत्येक वेळी सहभागी असणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या विशेष प्रयत्नाने झाल्यामुळे समस्त आलापल्ली येथील नागरिकांनी शुभेच्छा च्या वर्षाव केला आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) प्रमुख अतिथी आलापल्ली ग्रामपंचायत चे सरपंच श्री शंकर मेश्राम, उपसरपंच श्री विनोद अकनपल्लीवार, ग्रामपंचायत सदस्य श्री स्वप्नील श्रीरामवार, राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा प्रमुख लक्ष्मण येर्रावार, राष्ट्रवादी काँग्रेस चे सामाजिक कार्यकर्ते पुष्पा अलोने,माया कोरेत,अनुसया सप्पीडवार, सोमेश्वर रामटेके,मनोज बोल्लुवार, विशेष भटपल्लीवार ,वासुदेव पेद्दीवार,कैलास कोरेत, सत्यनारायण पेरगा,पराग पांढरे, नवनिर्वाचित पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी,प्रिती इष्टाम, यांच्यासह समस्त ग्रामपंचायत सदस्य व आलापल्ली शहरातील नागरीक बहूसंख्येने उपस्थित होते
हे देखील वाचा,