लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १३ नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे गोंडवाना सैनिकी विद्यालय चामोर्शी रोड (वाकडी ) गडचिरोली येथे दिनांक १२, १३ व १४ नोव्हेंबर असे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते, विधानपरिषदेचे आमदार डॉक्टर रामदासजी आंबटकर, माजी आमदार अनिल सोले, आ. डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री रविंद्रजी ओल्लारवार, प्रशांतजी वाघरे, गोविंदजी सारडा, प्रमोदजी पिपरे, नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, किसान
या प्रशिक्षण वर्गाला विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून त्याचा लाभ कार्यकर्त्यांना मिळणार आहे.
प्रशिक्षण वर्गाची सुरुवात दिनांक १३ ला सकाळी ९ वा. नोंदणीने होणार असून दिनांक १४ ला दु ३ वा. विदर्भ प्रदेश संघटनमंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर यांच्या उदबोधनानंतर या प्रशिक्षण वर्गाचा समारोप होणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रशिक्षण प्रमुख अनिल पोहनकर यांनी केले. प्रशिक्षण वर्गात अपेक्षित असणारे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले असुन कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
हे देखील वाचा :