लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, दि. १९ फेब्रुवारी : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.देवलमारी अंतर्गत येत असलेल्या कोलपल्ली येते जय गोंडवाना पी.आर.सी.सी.कोलपल्ली द्वारा आयोजित भव्य व्हालीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्हालीबॉल स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
सदर स्पर्धेचे उदघाटन आज गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवलमारी ग्रामपंचायत चे सदस्य महेश लेकुर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून देवलमरी चे सरपंच लक्ष्मण कन्नाके, इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम, हरीश गावडे, एस .बी.झाडे सर मुख्याध्यापक कोलपल्ली, बुच्चा आत्राम, मनोज सोयाम, मुकेश आत्राम, प्रदीप आत्राम, राजकुमार चालूरकर, विश्वनात गावडे तसेच महिला पुरुष व युवकांची उपस्थिती होती.
हे देखील वाचा :
देशसेवा बजावत असतांना राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित चव्हाण यांना वीरमरण