गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राचे उद्घाटन

विद्यार्थी व शिक्षणसंस्था नेतृत्वासमवेत आदिवासी चळवळीवर संशोधनाचे नवे पर्व...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात आज क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या स्थापनेतून आदिवासी चळवळीतील महान नेता बिरसा मुंडा यांच्या जीवनाचा, संस्कृतीचा आणि भाषेचा अभ्यास करण्यास तसेच त्यांच्या समस्यांवर संशोधन करण्यास महत्त्वपूर्ण व्यासपीठ निर्माण होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरूदास कामडी असून उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील बिंझाणी सिटी कॉलेजचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप तुंडुरवार उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य संजय गोरे, ननंदाजी सातपुते, विवेक गोर्लावार, तसेच अध्यासन केंद्राचे समन्व्यक डॉ. सत्यनारायण सुदेवाड उपस्थित होते.

डॉ. संदीप तुंडुरवार यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जीवनातील विविध पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकला, तर प्रास्ताविकाचे नेतृत्व व्यवस्थापन परिषद सदस्य संजय गोरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सहा. प्रा. हेमराज निखाडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सत्यनारायण सुदेवाड यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्ययन केंद्राचे उद्दिष्ट बिरसा मुंडा यांच्या जीवनाचा, संस्कृतीचा, भाषेचा आणि आदिवासी समाजाच्या समस्या व आव्हाने यांचा सखोल अभ्यास करणे आहे. तसेच, केंद्र भारतातील इतर आदिवासी समाजाचे जीवन, समस्या आणि विकासावर संशोधन करेल. केंद्र प्रबोधन व जनजागृती कार्यांनाही प्रोत्साहन देईल, ज्यामुळे विद्यार्थी, संशोधक व समाजसेवी आदिवासी इतिहास व संस्कृतीशी अधिक जवळीक साधू शकतील.

विद्यापीठाचे मत आहे की, या केंद्राच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांच्या आदर्शावर आधारित संशोधन, सामाजिक जनजागृती आणि विकासकार्य चालवण्यास महत्त्वपूर्ण व्यासपीठ तयार होईल.

Comments (0)
Add Comment