छल्लेवाडा येथे नवीन अंगणवाडीचे जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २ मार्च: अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा मध्ये नवीन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती शभास्कर तलांडे होते, यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, रेपनपलीचे सरपंच लक्ष्मी मडावी, उपसरपंच विलास नेरला, ग्रा.प.सदस्य वरलक्ष्मी झोडे, अशोक झाडे, पूजा देवगडे, संतोष गावडे, राहुल सुंदिला, लक्ष्मण कोडापे, अनुप्रिया भासरकर, प्रशांत गोडसेलवार, इरसाद शेख आदि  उपस्थित होते.      

या कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक सिडाम यांनी तर  आभार प्रदर्शन आर. मूरमाडे यांनी केले. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

ajay kankadalwar