धान खरेदी केंद्राचा इंदाराम येथे जिल्हा.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ.

शेतकऱ्यांनी धान शासकीय गोदामात विक्री करण्याचे केले आवाहन.

अहेरी ०२ डिसेंबर :- प्रशासकीय तांत्रिक अडचणीत वनजमीन असल्याने शेतकऱ्यांचे शेतात पिकविलेल्या धान विक्रीसाठी अडचण निर्माण झाली होती. मात्र शेतकऱ्याची अडचण लक्षात घेता आणि दुर्गम भागातील अंतर बघून आज नवीन धान खरेदी केंद्राचे  इंदाराम येथे शुभारंभ करण्यात आले. आदिवासी विकास महामंडळा मार्फत उप-प्रादेशिक कार्यालय अहेरी च्या सल्ग्नीत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्राचे परिसरात मागणी होत होती त्याची दखल कंकडालवार यांनी घेत आज धान खरेदी केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले .

सध्या शेतकऱ्यांचे खरीप  हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामाच्या धान खरेदी केंद्राचे बुधवार २  डिसेंबर रोजी कृषी गोदाम इंदाराम येथे केले.
यावेळी जि .प अध्यक्ष कंकडालवार यांनी, शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात धानाची विक्री करावी कारण  धानाला योग्य भाव व बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

धान खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम,व्येकटरावपेठाचे माजी सरपंच संपत सिडाम,माजी उपसरपंच शामराव राऊत,इंदाराम चे ग्रामसेवक किरंगे,बी.जी.गावडे,वसंत मेश्राम,तुमडे,जयराम आत्राम,बापू कट्टीवार,मुसली आत्राम,लालू मडावी,जाबिर शेख,फकीरा पेंदाम,बिचू मडावी,बुधाजी सोयाम,राजू वाघाडे,रोशन सामलवारआदीची उपस्थिती होती.

zp ajay kankadalwar