लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली (रेगडी), 13 एप्रिल :- गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोस्टे/उपपोस्टे / पोके हद्दीतील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या शिक्षणासह बौद्धीक कला गुणांना वाव मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ यांचे व नक्षल विचारधारेकडे आकर्षीत होवू नये. तसेच त्यांना जगात घडत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / प्रादेशिक/स्थानिक घडामोडी, शासकिय योजना इ. बाबत माहिती मिळावी व वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरीक्षेची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. याच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत पोमके रेगडी परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातून रेगडी येथे ऑनलाईन क्लासेस, प्रोजेक्टर रूम तथा स्पर्धापरिक्षा व इतर अभ्यासाकरीता नवीन इमारतीमध्ये सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आली.सदर वाचनालयाचे दिनांक १२/०४/२०१३ रोजी संदीप पाटील सा. पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प, नागपूर यांचे उपस्थीतीत ऑनलाईन क्लासेस, प्रोजेक्टर रूम व सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन झाले वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, सदरचे वाचनालय हे ग्रामिण भागात सुरु झाले असून शहरात असलेल्या वाचनालयाइतके असून वाचनालयाच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा शासकीय नोकरी मिळवून आपले व आपल्या गावाचे नाव उंचवावे, मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, जिल्ह्यात वाचनालयाची मोहिम राबवून जिल्ह्याची वाटचाल विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पोमके रेगडीने आतापर्यंत गाडेआमगाव, पोतपल्ली व रेगडी अस्था ०३ ठिकाणी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केलेली आहे त्यांचे हे कार्य चांगले आहे. पोमके रेगडी येथे आयोजीत केलेल्या जनजागरण मेळाव्यात ६०० ते ७०० च्या संख्येने नागरीक उपस्थित असलेल्या जनतेचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांना साड्यांचे व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. वाचनालयामध्ये स्वतंत्र्य अभ्यासिका, बैठक व्यवस्थेकरीता टेबल, पेअर, पुस्तके ठेवण्यासाठी कपाट व वाचनालयाकरीता पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सदर लोकार्पण सोहळ्यास मा. पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कैम्प नागपुर संदीप पाटील , मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी पंतिश देशमुख सा. उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणील गिल्डा व रेगडाच्या सरपंच मोहिता लेकामी तसेच रेगडी परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. प्रस्तावना पोउपनि नंदकुमार शिने, तर आभार प्रदर्शन पोउपनि राहुल विद्यते यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली प्रणील गिल्डा व पोगके रेगडी प्रभारी अधिकारी पोउपनि नंदकुमार शिव पोलीस अधीकारी, सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
हे पण वाचा :-