गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा.

गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ, पुढील काही तासात १२०० ते १६०० क्युमेक्स ने होणार पाण्याचा विसर्ग.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भंडारा 10 ऑगस्ट :-  

गेल्या दोन दिवसापासून ठीकठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणच्या धरणाच्या, नदी क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यातच भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द तसेच इंदिरासागर नावाने ओळखले जाणाऱ्या धरणाच्याही पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या ऊर्ध्व बाजूस असणाऱ्या सर्व धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय.आणि म्हणूनच गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 1200 ते 1600 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. याब्बीची सर्वांनी नोंद घ्यावी, तसेच नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :-

राष्ट्रकुल स्पर्धेचा रंगतदार समारोप! ६१ पदकांवर कोरलं भारताने नाव.

 

goshekurd damhevy rainwater loging