भारतीय डाक विभागात 2428 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

इंडिया टपाल म्हणून व्यापार करणारे टपाल विभाग, ही सरकारमधील संचालित टपाल प्रणाली आहे जी वाणिज्य मंत्रालयाची उपकंपनी आहे. सामान्यत: भारतात “पोस्ट ऑफिस” म्हणून ओळखली जाते, ही जगातील सर्वाधिक प्रमाणात वितरित केलेली पोस्टल सिस्टम आहे.

टपाल विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण डाकसेवक नोकरभरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय अखेर घेण्यात आला आहे. आता 10 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने अनेकांना या भरतीसाठी अर्ज करता आलेले नाही, त्यामुळे टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार माध्यमातून अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची गंभीर दखल घेत ही अर्ज करण्याची मुदत 10 जूनपर्यंत वाढविली आहे. या संधीचा लाभ बेरोजगार भूमिपुत्रांनी घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष अजय माने व सरचिटणीस अजित परब यांनी केले आहे.

 

 

 

indian postlead story