सरकार विरोधी एनजीओमध्ये अर्बन नक्षलीची घुसखोरी

ठाण्यात मुख्यमंत्री यांच्याकडून विरोधकांची पोलखोल 

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

ठाणे, 17 जुन – फेक नॅरेटीव्ह पसरवण्यात विरोधकांसोबत काही एनजीओ कार्यरत होत्या, त्यामुळे आतापर्यंत गडचिरोलीत असणारे अर्बन नक्षली आता या एनजीओमध्ये घुसले आहेत.तेच सरकार विरोधी काम करीत आहेत. अशी पोलखोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर शिवसेनेचे १९ टक्के मतदान होते त्यापैकी १४.५ टक्के मतदान आमच्याकडे आहे तर साडेपाच टक्के उबाठा कडे म्हणजेच उर्वरीत मतदान कुठले आहे ते सर्वांनाच माहित आहे. मोदी द्वेषाने पछाडलेले आता म्हणतायत गलती हो गयी, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट लगावला.

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधुन भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणुक लढवत आहेत.आ. डावखरे यांच्या प्रचारार्थ रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आ. डावखरे यांच्या व्हीजन डॉक्युमेंटचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.याप्रसंगी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे नवनिर्वाचित खा.नरेश म्हस्के, डॉ.हेमंत सवरा, माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील,ना. रविंद्र चव्हाण,आ.गणेश नाईक,आ.गीता जैन, प्रताप सरनाईक,मनिषा कायंदे ,रमेश पाटील, मंदाताई म्हात्रे,उमा खापरे,माजी खा.राजेंद्र गावित, आ.रविंद्र फाटक, राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव, आनंद परांजपे, मनसे नेते अविनाश जाधव, अभिजीत पानसे, रिपाईचे (आठवले) भास्कर वाघमारे, माधवी नाईक, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आदीसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाईचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंद यांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीत गाफीलपणा भोवल्याचे कबुल करीत विरोधकांच्या फेक नॅरेटीव्हमुळे हे घडल्याचे सांगितले. तरीही  भिवंडीचा अपवाद वगळता कोकण आता महायुतीचा बालेकिल्ला बनला आहे. विरोधकासोबत काही  एनजीओनी खोटे नॅरेटीव्ह पसरवण्याचे काम केले. केवळ गडचिरोली पर्यंत मर्यादित असणारा नक्षलवाद आता अर्बन नक्षली च्या रूपात या एनजीओच्या माध्यमातून शहरी भागात पसरला आहे. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.मोदी द्वेषाने पछाडलेले  हे लोक मोदी हटाव म्हणून घोषणा देत होते.पण मोदी हटले नाही आणि ते पुन्हा सत्तेत आले. मात्र चांगले काम  करूनही खोटे नॅरेटिव्ह पसरविण्यात काँग्रेस यशस्वी ठरली.तरीही लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी मधील मतांच्या टक्केवारीत जास्त फरक नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमुद केले.

कीर कीर कशाला…डायरेक्ट डावखरे – मुख्यमंत्र्याचे भाकीत

मागच्या वेळेस संजय मोरे आणि नजीब मुल्ला हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार महायुतीत आहेत. त्यामुळे, ८५ टक्के ऐवजी आता १०० टक्के मतदान निरंजन डावखरे यांना मिळेल. असे भाकित करून गेली १२ वर्षे आ.डावखरे यांनी चांगले काम केले आहे. तेव्हा, समोर उमेदवार कोण आहे ? त्याची कीर कीर कशाला डायरेक्ट डावखरे यांनाच पसंती मिळेल. असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कोकण पदवीधरचे विद्यमान आ. निरंजन डावखर यांना विविध संघटना आणि संस्थांचा वाढता पाठीबा मिळत आहे. कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाचे राजु कांबळे, महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) चे नरेश पवार,महाराष्ट्र राज्य शिव छत्रपती शिक्षक संघटना आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, ठाणे जिल्हा कला अध्यापक संघ आणि कोचिंग क्लासेस संघटनेच्या अमोल जगताप यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन डावखरे यांना पाठींबा जाहिर केला.

Comments (0)
Add Comment