महागाईचा झटका- सीएनजी 6 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात वाढ.

मुंबईत सीएनजी 86 रुपये प्रति किलो आणि पीएनजी गॅस 52 रुपये 50 पैसे प्रति एससीएम दराने उपलब्ध
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 3 ऑगस्ट :-  महागाई कमी होण्याची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना आणखी एक झटका बसला आहे. मुंबईत पुन्हा एकदा सीएजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत  पुन्हा एकदा सीएनजी ६ रुपयांनी, तर घरगुती पाईप नैसर्गिक वायू ४ रुपये प्रति किलोने महाग झाला आहे. सीएनजी दरात करण्यात आलेली ही वर्षभरातील दुसरी सर्वात मोठी वाढ आहे. मुंबई महानगर क्षेत्रात आता सीएनजी ८६ रुपये प्रति किलो, तर पीएनजी ५२.५० रुपये प्रति एससीएम झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून मंगळवारी ही घोषणा करण्यात आली आहे.

इंधन, गॅस सिलिंडर आणि वीज दरवाढीने अधीच नागरिक त्रस्त असताना आणि वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत असताना आता महानगर गॅसनेही दरवाढीचा चटका दिला आहे. महानगर गॅसने सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसच्या दरात वाढ केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने एका निवेदनात म्हटले आहे की, गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे, आम्ही खर्च कव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आम्ही CNG च्या किरकोळ किमतीत 6 रुपये (प्रति किलो) आणि घरगुती PNG (पाइप नॅचरल गॅस) च्या किरकोळ किंमतीत 4 रुपये (प्रति युनिट) वाढ केली आहे.

ज्यातील विविध शहरातील सीएनजीचे दर

  • नागपूर – ११६ रुपये
  • पुणे – ८५ रुपये
  • पिंपरी चिंचवड – ८५ रुपये
  • मुंबई ८० रुपये
  • नवी मुंबई – ८० रुपये
  • ठाणे – ८० रुपये
  • नाशिक – ६७.९० रुपये
  • धुळे – ६७.९० रुपये

हे देखील वाचा :-

केंद्रीय पथकाकडून सिरोंचा तालुक्यात पूरबाधित भागाची पाहणी

cng-price-hikemumbaiPNG price hike