इन्स्पायर मॉर्डन इंग्लिश मिडियम स्कूल आलापल्ली तर्फे सामूहिक राष्ट्रगीत घेऊन अमृत महोत्सवाची सांगता !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, १७ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधत गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सांगता आज सकाळी ठीक ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन घेऊन करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.ए.टी.अलोने (उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ) हे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटन ऍड. जी.एस. बोगमी (फौजदारी न्यायालय अहेरी) यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ .आर. आर. गावडे, सौ.एस. आय.शेख, अंगणवाडी सेविका श्री. आर. मडावी उपस्थित होत्या.

आज विविध स्पर्धेत विशेष गुणवत्ता दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक स्वरूप गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका कु.मोनिका चौधरी यांनी केले.या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य सारिका ताकलवार यांचे लाभले.

हे देखील वाचा : 

आजादी का अमृत महोत्सव अंधारात कोरची तालुक्याची व्यथा कोण समजून घेणार ?

शहरात बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी मृत्युमुखी तर दुसरा गंभीर जखमी !

 

75thindependancedayallapalliIndependenceInspire School