गडचिरोलीच्या दोन खेळाडूंना नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला जाण्यासाठी खा. अशोक नेते यांनी केली आर्थिक मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ एप्रिल: इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात गडचिरोली जिल्ह्याच्या दोन खेळाडूची निवड झाली असून या खेळाडूंना सदर स्पर्धेला जाण्यासाठी भाजपाचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी आर्थिक मदत केली व त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

        इंडो – नेपाळ आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नेपाळच्या पोखरा येथील मैदानावर दि. ७ ते ११ एप्रिल २०२१ दरम्यान खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील हरिदास एम. मडावी व भुपेश ए. राऊत यांची निवड करण्यात आली असून ते सदर स्पर्धेसाठी नेपाळ ला रवाना झाले आहेत.

खा. अशोक नेते यांनी सदर दोन्ही खेळाडूची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांना स्पर्धेसाठी आर्थिक मदत केली तसेच त्यांना स्पर्धेत विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ashok nete