नागपूर जिल्ह्यातील 80 गावांमध्ये पोहोचणार इंटरनेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपुर 30 सप्टेंबर :-  केंद्र सरकारचा स्ट्रॅटेजिक सार्वजनिक उपक्रम असलेला भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल देशातील 28 हजार गावांमध्ये ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दूरसंचार कव्हरेज नाही, अशा ठिकाणी विलेज सॅच्युरेशन प्रोजेक्ट अंतर्गत नेट सुविधा तसेच इतर सुविधा येणार असून यासाठी नागपुरातील ८० गावांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती नागपूर बिएसएनएलचे प्रधान महाव्यवस्थापक यश पान्हेकर यांनी नागपूर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. येत्या 1 ऑक्टोबर रोजी बिएसएनएल चा 23 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 4 जी सेवेचे देशाच्या सर्व भागात संचालन केले जात असून भविष्यकाळात पूर्णपणे भारतीय बनावटीच्या मोबाईल उपकरणांमध्ये 5 जी सेवा देण्यासाठी देखील बीएसएनएल तयार आहे असे देखील त्यांनी यावेळेला सांगितल.

हे पण वाचा :-

BSNLnagpur