आलापल्ली-सिरोंचा रस्त्याची चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करा – संतोष ताटीकोंडावार यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत आलापल्ली-सिरोंचा या मार्ग क्र. 353 चे नुकताच दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदर रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिका-यांना पाठविले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आलापल्ली-सिरोंचा मार्ग क्र. 353 या रस्त्याची डागडुजी करण्याकरीता सन 2020-21 व 2021-22 अशा दोन वर्षाच्या कालावधीत 10 ते 15 कोटी रुपये खर्ची घालण्यात आले. मात्र सदर रस्त्याचे नवे बांधकाम करण्यात आलेले नाही. दरम्यान मागील काही दिवसांपासून दक्षिण क्षेत्रात झालेल्या पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहतूकदारांसह प्रवाशांना या मार्गावर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

अन्यथा मार्गावर वृक्षारोपण आंदोलन छेडणार

दक्षिण क्षेत्रातील महत्वाचा मार्ग असलेल्या या रस्त्याची समस्या तत्काळ निकाली न काढल्या येत्या दहा दिवसात सदर मार्गावर वृक्षोरापण करुन आंदोलन छेडण्याचा इशाराही संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

सदर बांधकामात अत्यंत निकृष्ट साहित्याचा वापर झाल्यानेच पहिल्याच पावसात बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता व संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करुन दोषी आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करीत कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे. असेही निवेदनात म्हटले आहे.

हे देखील वाचा :

गोविंदपूर नाल्यावरील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा – खा. अशोक नेते

जिल्ह्यात कोविड बाबत नियमावली आणि उपाययोजना १४ जूननंतरही राहणार सुरु

मल्लमपोडूर,कोरेगाव येथील सरपंचाशी साधला मुख्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात संवाद

 

lead storyMaharashtra highway 353Santosh Tatikondawar