युवकांमध्ये जोश निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे – खा.अशोक  नेते

युवा कबड्डी क्लब अरसोडा द्वारे भव्य रात्रकातीन खुली कबड्डी स्पर्धा आयोजित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आरमोरी, 27 ऑक्टोबर :- अरसोडा या गावी आयोजित केलेली भव्य रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धा हि कौतुकास्पद आहे. अशा मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे आहे. याचा आदर्श सर्व गावांनी घेतला पाहिजे. अशा या मैदानी खेळामुळे युवकांना उत्साह, आनंद मिळतो. खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य  चांगले राहते. त्यामुळे युवकांमध्ये जोश  निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे आवश्यक आ असे प्रतिपादन  खा.अशोक नेते यांनी केले. युवा कबड्डी क्लब अरसोडा तालुका आरमोरी यांचे वतीने भव्य रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धेचे शुभारंभ व उद्घाटन रीबिन कापून  खा.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अरसोडा या गावी युवकांना प्रोत्साहन देऊन मैदानी खेळाचे नियम पाळून युवकवर्गानी आनंद, उत्साहाने खेळावे. असे प्रतिपादन आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले. यावेळी भाजपाचे प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, लुकाध्यक्ष नंदू पेटेवार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
याप्रसंगी खा.अशोक  नेते. गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, आरमोरी विधानसभेचे आमदार  कृष्णा गजबे, प्रदेश संपर्क प्रमुख सदानंद  कुथे, भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, सभापती भारत बावनथळे, नगरसेविका कीर्ती पत्रे, विजय अग्रवाल, प्रकाश भोयर, अशोक भोयर, नंदू नागतोडे तसेच अनेक गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी  उपस्थित होते.
हे पण वाचा :-

 

Kabadditournament