गडचिरोली जिल्ह्यात आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू.प्रवेश प्रक्रिया कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व आय.टी.आय.मध्ये रोजगाराभिमुख कोर्सेससाठी ऑनलाईन अर्ज गडचिरोली, अहेरी, एटापल्ली, भामरागड, धानोरा, कुरखेडा, चामोर्शी, वडसा, सिरोंचा व आरमोरी या केंद्रांचा समावेश.

कोपा, वायरमन, इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, मोटर मेकॅनिक, ड्रेस मेकिंग, डाटा एंट्री ऑपरेटर आदी अभ्यासक्रम उपलब्ध १० वी उत्तीर्ण पात्र, काही कोर्सेससाठी ८ वी उत्तीर्णांनाही संधी. http://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज उपलब्ध शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो, जात प्रमाणपत्र (लागल्यास) आवश्यक प्रवेश घेतल्यानंतर अप्रेंटिसशिप, नोकरी मेळावे, स्वयंरोजगाराच्या योजना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शासनाच्या विविध रोजगारसंधी उपक्रमांत सहभागाची संधी.

प्रशिक्षणात गुणवत्ता व शिस्तीला प्राधान्य – जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गडचिरोली यांचे आवाहन प्रवेशासाठी अर्जकर्त्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज भरावेत – आय.टी.आय. प्राचार्य एस. एस. चौधरी यांचे आवाहन अधिक माहितीसाठी स्थानिक आय.टी.आय. कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा.

 

Gadchiroli itiITI addmission openskill india