देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गंभीर आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २४ मार्च: पोलिसांच्या बदलाबाबत आस्थापना मंडळ असते, त्या आस्थापना मंडळ शिफारशी करत त्या प्रमाणे बदल्या होत असतात. त्यांनी शिफारशी केल्या प्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. उलट माजी गृहमंत्र्यांनी या आस्थापना मंडळाला डावलून किती बदल्या केल्या हे पहिला सांगावे, त्यांनी अनेक बदल्या या नियम डावलून केल्या आहेत. त्यांनी किती नियम डावलले यांचा अभ्यास करण्याची गरज आहे. जो डेटा त्यांनी दिला आहे त्यात विशेष काही नाही. त्यांनी जी उदाहरणे दिलेली आहेत त्या चुकल्या आहेत. त्यांनी जो अहवाल सादर केला तो धादांत चुकीचा आहे. लोकांचं संभाषण रेकॉर्ड करणं हा अधिकार याना कोणी दिला. याबाबातीतले संकेत पायदळी तुडवून रेकॉर्डिंग करणं हा अधिकार कोणी दिला.

फोन टॅपिंग कधी केलं जातं याचे काही नियम आहेत. हे टॅपिंग कोणाच्या परवानगीने झाले, रश्मी शुक्ल यांना परवानगी कोणी दिली?, त्याबाबत राज्य गुप्त वार्ता विभाग यांना याचे अधिकार असतात. रश्मी शुक्ल या आयुक्त असताना त्यांनी माहिती कशी गोळा केली त्यांना भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून काम कसं करावे लागले हे सर्व समोर आले आहे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी यंत्रणेचा गैरवापर कसा केला हे सर्व उघड झाले आहे. याबाबत लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जेकाय आरोप झालेत ते सर्व समोर येतील

आज पुन्हा प्रेस घेऊन या गोष्टी सतत मीडियात देण्याचे काम विरोधी पक्ष नेते करत आहेत. आज केलेले सर्व आरोप खोटे आहेत. या सर्व बदल्या बोर्डच्या माध्यमातूनच झाल्या आहेत. कोणी तरी या बदल्या अपरदर्शी झाल्या असे सांगत आहेत मात्र या बदल्या नियमातून झाल्या आहेत.

फडणवीस गृहमंत्री असताना नियम डावलून अरजन्सी मध्ये किती बदल्या करण्यात आल्या हे उघड होणं गरजेचं आहे. फोन टॅपिंग ही गंबिर बाब आहे.

अधिकाऱ्यांचा अधिकार बाजूला केला त्यांची बदली केली ही सरकारची चुकी नाही. या आकसापोटी त्यांनी धादांत खोटे आरोप केले या आरोपांना राज्यातील जनता भीक घालणार नाही.

मानासुक हिरा हत्या, जिलेटीन कांड्या यांचा तपास होणे गरजेचे होते. हिरान हत्येच्या शेवटी आम्ही होतो मात्र एनआयए यामध्ये आली. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी साठी बोलावणार होतो त्यातच एनआयए मध्ये आली. एटीएस नी खूप चांगला तपास केला होता. आणखी चार दिवसांचा कालावधी मिळाला असता तर हत्येचा उलगडा झाला असता. आता एनआयए काय करते हे पाहावे लागेल.

फडणवीस रोज प्रेस घेऊन जनतेचे लक्ष वेगळीकडे वाढण्याचे प्रयत्न का करत आहेत हा मुख्य प्रश्न आहे. तपास योग्य दिशेने झाला पाहिजे. आमची भाबडी आशा आहे की एन आय ए योग्य तपास करेल.

Devendra Fadnavinjayant Patil